। या पल्ली नगरीत वास करूनी तारीतसे सज्जना।
। श्री बल्लाळविनायक
प्रभु अहो घ्या त्याचिया दर्शना।
। तो हा सिद्धीगणेश येत असता चिंता तुला कायशी।

। त्याते तू भजता नरा खचितरे सायुज्जता पावशी।

सुस्वागतम् सर्व बल्लाळभक्तांचे हार्दिक स्वागत.

नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती आहे त्या बल्लाळ विनायकाच्या माहितीची ही वेबसाईट.

 

श्री बल्लाळेश्वराचे महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर किंबहुना देशाविदेशात असंख्य भक्त आहेत. जे गणेश भक्त श्रींची कथा, मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थेच्या कारभाराची पद्धत, संस्थेतर्फे केलेल्या सुधारणा तसेच अभिषेक योजना या विषयी अनभिज्ञ आहेत त्यांना या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून ही वेबसाईट काढण्याचे ठरविले. 

हा आमचा एक प्रयत्न आहे, ज्या मार्फत आम्ही श्री बल्लाळेश्वर देवस्थानासंबधीची माहिती सर्व भाविकांपर्यंत पोहचवू इच्छितो. तूम्हास काही सूचवायचे असेल वा तुमची प्रतिक्रिया कळवायची असेल तर कृपया पुढील पत्त्यावर कळवावी. palidevasthan@gmail.com

श्री बल्लाळेश्वराचे दर्शनाला येणा-या सर्व भाविकांची मनोकामना श्री पूर्ण करोत ही सदिच्छा. 

आपले विनम्र,
पाली
देवस्थान

खास आभार :

श्री सचिन दाभोळकर, पाली
श्री
त्रिंबक गवंडी, मुंबई
श्री
मनोज महाल्ये श्री नितीन कुवर,
मुंबई
श्री अनय माळगावकर
, मुंबई
श्री. योगेश राऊत, पाली