) देवालयातून दिसणारा सरसगड हा शिवाजी कालीन टेहेळणीचा किल्ला आहे, किल्ल्यावर टेहेळणीचे बुरूज प्राचिन शिवमंदिर पहाता येते.

) पालीपासून किलोमीटर अतंरावर भूगर्भातून भुपृष्ठावर वहाणारे गंधयुक्त गरम पाण्याचे झरे उन्हेरे येथे पहावयास मिळतात. तेथेच पाली गावाला पाणीपुरवठा करणारे ``उन्हेरे धरण'' हा मातीचा बंधारा आहे. येथून जवळच केशवनगर येथे ``श्री रुद्रेश्वर शिवमंदिर'' आहे. येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. श्रावणी सोमवारी `बर्फाची वाडीभरली जाते.

) भोर संस्थानिकांची कुलदेवता श्री भोराई देवी १५ किमी. अंतरावर आहे देवीची स्थापना भृगू ऋषींनी केली आहे. नवरात्रामध्ये १० दिवस गडावर मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा होतो. देवीची स्थान जागृत आहे. ह्या किल्ल्याला ``सुधागड'' असे म्हणतात.

) गोमाशी येथील डोंगरात ``भृगुऋषी'' स्थान असून नाडसूर जवळच ``ठाणाळे'' येथे सुंदर कोरीव लेणी आहेत.

) श्री रामास ज्या ठिकाणी देवीपासून वर प्राप्त झाला ते ठिकाण उसर येथे आहे. त्या देवीस ``वरदायिनी'' असे संबोधतात. हे निर्सगरम्य स्थान पालीपासून कि. मी. अंतरावर आहे. ही पालीची ग्रामदेवता आहे. येथेही नवरात्रात दहा दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो.

) रावणाने जटायुशी युद्ध करून ज्या ठिकाणी जटायुचे पंख छाटले श्री रामांनी ज्या ठिकाणी जटायुचा उद्धार केला ते ``उद्धर'' स्थान तेथून वर रामेश्वर येथे श्री शंकराचे स्वयंभू स्थान पाली येथून १४ कि. मी. अंतरावर आहे. उद्धर येथे अस्थी विसर्जनाचे कुंड आहे. येथे अस्थी पाण्यात विरघळतात. येथूनच जवळ ``रामेश्वर वैभव'' हे थंड हवेचे ठिकाण आहे.

) पालीपासून कि. मी. अंतरावर सिद्धेश्वर येथे ३५० वर्षापूर्वीचे पाषाणी स्वयंभू शंकराचे स्थान आहे. येथे (कार्तिक शु. पोर्णिमा) त्रिपुरारी पोर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो.

) सिद्धेश्वरजवळ पुई येथे ``एकविस गणपतीचे'' सुंदर मंदिर पहावयास मिळते.

) पालीपासून अंदाजे १७ किलोमीटर अंतरावर आसरा नवघर येथे श्री विरेश्वराचे स्वयंभू स्थान आहे.

१०) पाली शहरात मल्लिकार्जुन, हटाळेश्वर, केदारेश्वर ही शिवमंदिरे तसेच पूर्वाभिमुख मारूती मंदिर, दत्त मंदिर, श्रीराम मंदिर, अंबामाता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, महाकाली मंदिर, मरिमाता मंदिर ही अन्य मंदिरे आहेत.